वाई : राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षाच्या ताब्यात असलेला सातारा मतदारसंघ पक्षातील फुटीनंतर कायम राखण्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला यश येते का, याचीच अधिक उत्सुकता या मतदारसंघात आहे. यंदा राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे विरुद्ध भाजपचे उदयनराजे भोसले यांच्यात कमालीची चुरशीची लढत होत आहे. निवडणुकीच्या तोंडावर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गैरव्यवहारात शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने तो प्रचाराचा मुद्दा झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची १९९९ मध्ये स्थापना झाली आणि लगेचच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघात राष्ट्रवादीने विजय संपादन केला होता. त्यानंतर गेली २५ वर्षे हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. २०१९ मध्ये उदयनराजे भोसले राष्ट्रवादीच्या वतीने निवडून आले पण त्यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे यांचा पराभव केला होता. असा हा राष्ट्रवादीचे बालेकिल्ला असलेला मतदारसंघ राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार गटाकडे कायम राहतो का, याचीच सर्वाधिक उत्सुकता आहे. अजित पवार गटाने हा मतदारसंघ भाजपच्या उदयनराजे यांच्यासाठी सोडून तलवार मान्य केली. यामुळे साताऱ्यात खरी राष्ट्रवादी कोणती याचा जनमताचा कौल समजणे शक्य नाही.
विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव लढण्यास नकार दिला. यामुळे राष्ट्रवादीत उमेदवारीचा तिढा होती. काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पक्षाने प्रस्ताव दिला होता पण त्यांनी राष्ट्रवादीच्या वतीने लढण्यास नकार दिला. शेवटी विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या शशिकांत शिंदे यांना पक्षाने रिंगणात उतरविले आहे. दुसरीकडे, लोकसभेत पराभव झाल्यावर मागील दाराने खासदारकी मिळविलेल्या उदयनराजे भोसले यांना उमेदवारीसाठी बरीच प्रतीक्षा करावी लागली. दिल्लीत ठाण मांडून बसावे लागले. छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज असल्याने भाजप नेतृत्वाचा नाईलाज झाला. काँग्रेसने कोल्हापूरमध्ये शाहू महारांजांना उमेदवारी दिल्याने भाजपपुढे साताऱ्यात पर्याय नव्हता.
Mauris mattis auctor cursus. Phasellus tellus tellus, imperdiet ut imperdiet eu, iaculis a sem. Donec vehicula luctus nunc in laoreet.